झाडे
ही झाडे,
सदा टवटवीत,
कुठून येई ऊर्जा यांच्यात?
ऊन वारा पाऊस,
तरीही न त्रागा कसला,
न चिंता देखील
वाऱ्या संगे डुलतात,
उन्हात अन्न तयार करतात,
पावसात जणू जलाअभिषेक
काही विस्तीर्ण,
काही सामान्य,
परी सर्वांना रसाळ फळे देतात
कितीतरी जीवांचे घरे यावर,
परी सदैव सुखात,
देई प्राणवायू
देई सावली प्रत्येकास,
वेलीला आधार,
प्रत्येक झाडात बहुविध गुणधर्म
कुणाची पाने,
कुणाची साल,
कुणाची मुळे
कुणाची फळे देती अपार शक्ती,
कसे जगावे याचे जिवंत उदाहरण,
जणू संत ऋषी मुनी या जगीचे
सृष्टीचा आधार,
ह्यांच्यामुळे तर पडतो पाऊस,
जमिनीची धूप रोखती
नवचैतन्याची खाण जशी,
ही झाडे परिपूर्ण जीवनाची गाथा जशी
Pingback: ढग - निकविता
ऑक्टोबर 10, 2025