सकारात्मक विचारांची शक्ती

सकारात्मक

सकारात्मक विचारांची शक्ती अपार,
होई मंगल कार्य,
वाढे प्रभाव,

जरी भासे सामान्य,
परी हेच जग बदलण्याचे साधन,
जसे विचार तशी कृती,

जर विचार चांगले तर कृती देखील चांगली,
करता चांगले विचार घडे देखील चांगलेच,
साधे सोपे परी कृतीत कठीण गोष्ट

वाढे आत्मविश्वास,
मनुष्य होई आशावादी,
कितीही कठीण प्रसंग तो सहज त्यास तोंड देई

विचार एक चेतना स्वरूप,
ऊर्जेचे रुपक,
मेंदू करे तंतू निर्मित

एक विजेचा प्रवास शरीरात,
त्यास दिली भावनांची जोड,
होई निर्मिती चुंबकीय क्षेत्राची

अन घडे सृष्टीत बदल,
आकर्षिले जाई सम कण,
अन सकारात्मक गोष्टी घडे

न कोणता विचार,
न आशावादी विषय,
वैज्ञानिक बाजू

विचार हे संसर्गजन्य बाब,
चांगल्या विचारांचा संसर्ग यशाचे कारण,
त्यामुळे सदैव असावे सकारात्मकच

No Comments
Post a comment