वनराई

वनराई

ही वनराई,
सदा हरित,
सृष्टीचे सौंदर्य अन नियमनचे मुख्य साधन

देई प्राणवायू,
देई नाना फळे रसाळ गोमटी,
अनेकांचे निवासस्थान

पाने फुले अन फळे औषधी,
ऊन वारा पाऊस झेले,
देई सावली

ह्यांच्यामुळे सृष्टी सुंदर,
ह्यांच्यामुळे अप्राणवायूचे प्रमाण कमी,
रोखे धूप धरून ठेवी मातीस

ह्यांच्यामुळेच तर न धासळे डोंगर,
ह्यांच्यामुळे प्राणीमात्र सुखात,
निवारा अन परिपूर्ण वातावरण

अबोल परी जीवनाचे अगाध ज्ञानाचे स्त्रोत,
कसे जगावे जीवन,
याचे जिवंत उदाहरण

नसे मेंदू परी बुद्धिमान,
अगदी एका टोकाची गोष्ट दुसऱ्या टोकांपर्यंत पोहचवी,
स्वतंत्र अन क्लिष्ट त्यांची संवादाची प्रक्रिया

मानव त्याबाबतीत अज्ञानी,
ह्यांचे सर्व शरीर अन जीवन पडे दुसऱ्याच्या कारणी,
जीवनमूल्ये शिकवी न वापरता कोणते शब्द मानवी

1 Comment
Post a comment