उपहारगृह
उपहारगृह एक उत्तम व्यवसाय,
तृप्त होई जीव,
पुण्याचे काम
नाना जिन्नस तिथे,
चवदार आणि चटकदार गोष्टी अनेक,
सांगाल त्या चवित तयार करती
जसे आवडे तसे करती,
नाश्ता असो की जेवण,
मागाल तेंव्हा हजर
बसण्याची व्यवस्था तिथे,
पाणी अन सेवेसाठी वाढपी उभा समोर,
सांगाल ते आणून देई चटकन
कुणी कुटुंब,
कुणी मित्रमंडळ,
कुणी व्यवसायाची बैठक
गोष्टींची यादी समोर,
सांगा काय हवे नको,
देती ते सहज उपलब्ध करून
खमंग वास सर्वत्र,
भूक भागण्याचा जणू यज्ञ,
हात धुण्याची व्यवस्था
स्वच्छता आणि टापटीप,
मालकाचा हसरा चेहरा अन वाढपींची चाले धावपळ,
उपहारगृह सकाळी लवकर सुरू होऊ रात्री उशिरापर्यंत सुरू राही
आनंदी चेहरे,
हास्याचे तुषार,
कुणी आपल्याच कार्यात मग्न
0 Comments