ध्वनी
ध्वनी गुंजतो नभोमंडळात,
शंखनादाची लय पसरते,
गडगडाटी गडगड वारा घेई
जंगलातील पक्ष्यांची किलबिल,
ओढ्याच्या प्रवाहात मधुर गाणे,
ध्वनी निसर्गाशी नाते घट्टे
महालांच्या दालनात वीणा गाते,
नादब्रह्माचे सूर झंकारतात,
घंटांची गूंज आकाश व्यापते
गावोगावी वऱ्हाडी ढोल वाजे,
ताशांच्या तालावर पावले पडती,
उत्सवात आनंद झंकारतो
मातीच्या घरात गुंजते
आईच्या स्वरात झोप उमलते
प्रेमाच्या लयीवर शांतता झेपे
डोंगरावर प्रतिध्वनी खेळतो,
एक हाक शंभरदा परत येतो,
खोल दऱ्यांत शब्द उमटतो
पवनाने नेलेले गुपित ऐकू येते,
तरंगांच्या तालात स्वर दाटे
सागर गाण्याचा विशाल उगम
नाद हे विश्व,
लयीच्या ठेक्यावर वेळ गुंफतो,
ध्वनी अखंड जीवनभर पसरतो
0 Comments