वाहनतळ
वाहनतळ एक गरजेची बाब,
प्रतिमाणशी गाडी इथे,
येजा करण्याचे साधन
त्यामुळे वाहनासाठी आवश्यक गरज,
जागेचा प्रश्न उभा राही,
असेल व्यवस्थित जागा तर न येई अडचण
नाहीतर मग स्वतःला अन जगाला त्रास,
रस्त्याच्या कडेला, कुणाच्या दारात,
कुणाच्या भलत्याच्या वाहनतळात
मग वाद अन वाहतूककोंडी पर्यंत अनंत अडचण,
त्यासाठी स्वतःचे स्वतंत्र वाहनतळ आवश्यक बाब,
असेल आच्छादन तर उत्तम
नाहीतर ऊन वारा पाऊस,
त्याचे संरक्षणच्या जबाबदारीत वाढ,
जसे माणसाला लागे जागा
तशी वाहनांना देखील जागा आवश्यक,
लहानशी बाब परी महत्वाची गोष्ट,
न उभे राही कोणते नवे प्रश्न
वाचे ताण,
गाडीचे देखील वाढे आयुष्य,
असावा उत्तम अन संरक्षित परिसर
जिथे उभी राहू शके वाहन सहज,
न यावा अधिक ऊन वारा अन पाऊस,
एक महत्वाची बाब वाहनतळ
0 Comments