प्रेरणा — अंतःकरणातील नवचैतन्य
प्रेरणा उमलते अंतःकरणाच्या शांत कोपऱ्यात, जिथे विचारांची पालवी हलकेच हलते, नव्या स्वप्नांच्या किरणांनी मन उजळते, क्षणभर स्थिर झालेल्या प्रवाहाला चालना मिळते, एक स्पर्श, एक शब्द, अन दिशा बदलते, अश्रूंतूनही हसू फुलते त्या ऊर्जेत,
सहनशक्ती — अंतःबलाची ओळख
सहनशक्ती ही अंतःकरणातील दीपज्योत, ती वेदनांवर फुलवते संयमाचे फुल, आघातातही ठेवते मन स्थिर व शांत, अडथळ्यांच्या पर्वतावर उभी राहते, न थकता, न डळमळता वाट चालते,
प्रयत्न — जीवनातील सततचा उगवता दीप
प्रयत्न, मनाच्या मातीतील अमोल बियाणं, घामाच्या थेंबांतून अंकुरतं ते तेज, अंधारातही वाट दाखवतं उजेडाचं बीज, चुका होतात, पण न थांबत चाल,
भाषा — विचारांची ओळ, संस्कृतीचा स्पंदनशील श्वास
भाषा ही मनातील विचारांची वाहिनी, शब्दांच्या लहरींतून वाहते भावना, आणि संस्कृतीचा सजीव ठसा उमटवते काळावर, अक्षरांची जोड तयार करते आत्म्याचा पूल,
वाहक – काळाची दिशा
वाहक चालतो रस्त्यांवरी, पाठीवर जगाची जबाबदारी भारी, घामात ओथंबले श्रमाचे शौर्य सारी, त्याच्या हातांत काळाची दिशा, पत्रांत मावले नात्यांचे विश्र्वासा,
ध्येय – एक प्रवास
ध्येय प्रत्येकाचे, कुणाचे पैसे, कुणाचे इमले कुणाची पदवी, कुणाची अन्य काही, प्रत्येकाने बाळगलेले असते ध्येय प्रत्येकजण त्यासाठी धडपडे,
आशा
आशा एक दिशा, जी नेई ध्येयाच्या दिशेने, एक किरण जो उजळे मार्ग जसा पहाटेचे सोनेरी किरण, येताच सरतो अंध:कार, तसेच आशेचे सरते दु:ख येई उत्साह कार्याच्या दिशेने होते मार्गक्रमण, यश भेटण्याच्या संधी वाढतात, आत्मविश्वास दुणावे सहज विजयाचा मार्ग होई सुकर, आनंदाचा परिमळ असे सदैव सोबत, मानवाचा एक उत्तम गुण जो नेई यशपर्यंत, संकटात
स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती हा शब्द जसा, तेजाळी अंतःकरणात, प्रेरणेचा दिवा उजळे, आशेचे दीप पाझरे, मनाच्या आकाशात उभरे, नवे उषःकालरंग दृढ निश्चयाची वीण गुंफून,
आत्मचिंतन
आरशामध्ये चेहरा दिसे, पण अंतरीचे रूप लपले, शोध मनाचा चालू राहे, आत्मचिंतन प्रतिबिंब दाखवे स्मृतींच्या वाटा ओलांडून, भूतकाळ दार ठोठावे, छायांत उत्तर हरवलेले,