आशा एक दिशा, जी नेई ध्येयाच्या दिशेने, एक किरण जो उजळे मार्ग जसा पहाटेचे सोनेरी किरण, येताच सरतो अंध:कार, तसेच आशेचे सरते दु:ख येई उत्साह कार्याच्या दिशेने होते मार्गक्रमण, यश भेटण्याच्या संधी वाढतात, आत्मविश्वास दुणावे सहज विजयाचा मार्ग होई सुकर, आनंदाचा परिमळ असे सदैव सोबत, मानवाचा एक उत्तम गुण जो नेई यशपर्यंत, संकटात