यंत्र म्हणजे माणसाच्या विचारांचं रूपांतर, हातांची जागा घेतली त्यांनी अचूक हालचालींनी, बुद्धीच्या ठिणगीने जन्म घेतला हा नवा सहकारी, लोहातही त्यांनी प्राण ओतले

आर्थिक जीवन कष्टाचा प्रवाह, मानवाच्या श्रमांतून उगवतो नवउजाळा भाव, साकारते संपत्तीची बीजे, उद्योग, व्यापार, शेतीत दडले सुवर्ण बीजांचे गूढ सेजे,

ग्राहक ज्यासाठी उद्योग उभे, त्याच्या आवडी निवडवर तयार होती उत्पादने, त्यासाठी चाले अभ्यास त्यासाठी जाहिरात क्षेत्र उभे, चौकाचौकात मोठमोठे फलक,

जाहिरात एक उद्योग, प्रत्येक उद्योगाचा श्वास, नाना आकार नाना प्रकार, रस्त्यावरील फलक असो की भ्रमणयोजकातील जाहिराती, वा दुसंच मधील जाहिराती कल्पकतेचा प्रांत,

उद्योग करे प्रत्येकजण, ज्यात ज्याला रस, ज्यात होई उदरभरण ते करे सर्वजण नोकरी हाही एक प्रकारचा व्यवसाय, काही ठराविक कामांचा अन काही ठराविक तासांचा व्यवसाय,