प्रेरणा उमलते अंतःकरणाच्या शांत कोपऱ्यात, जिथे विचारांची पालवी हलकेच हलते, नव्या स्वप्नांच्या किरणांनी मन उजळते, क्षणभर स्थिर झालेल्या प्रवाहाला चालना मिळते, एक स्पर्श, एक शब्द, अन दिशा बदलते, अश्रूंतूनही हसू फुलते त्या ऊर्जेत,

आशा एक दिशा, जी नेई ध्येयाच्या दिशेने, एक किरण जो उजळे मार्ग जसा पहाटेचे सोनेरी किरण, येताच सरतो अंध:कार, तसेच आशेचे सरते दु:ख येई उत्साह कार्याच्या दिशेने होते मार्गक्रमण, यश भेटण्याच्या संधी वाढतात, आत्मविश्वास दुणावे सहज विजयाचा मार्ग होई सुकर, आनंदाचा परिमळ असे सदैव सोबत, मानवाचा एक उत्तम गुण जो नेई यशपर्यंत, संकटात

आठवड्यांचे वार, सोमवारी प्रभात नवी, उमलती कर्तृत्वाची चाहूल, हातात ध्येयाची वाट मंगळवारी जोम वाढतो, कष्टांच्या ओघात दिवस सरतो, नवी उमेद उभी राहते