झाडे
ही झाडे, सदा टवटवीत, कुठून येई ऊर्जा यांच्यात? ऊन वारा पाऊस, तरीही न त्रागा कसला, न चिंता देखील वाऱ्या संगे डुलतात, उन्हात अन्न तयार करतात, पावसात जणू जलाअभिषेक
झाडे
झाडे पृथ्वीचे रक्षक, सदा हरित, सदा उत्साही पाहता यांना उत्साह येई, ऊन वारा पावसाचा मारा, न आडोसा सदा सर्वदा बाहेर तरी सदैव आनंदित, वाऱ्या संगे डुले,
झाड
झाड दिसे सामान्य परी त्याचे महत्व अपार, ऊन वारा पाऊस, तरीही सदा हरित देई फळे रसाळ, देई सावली उन्हात, अनेक जिवांचा निवारा त्यावर पाने फुले अगदी ते स्वत: देखील, न काहीच वाया जात, प्रकाशापासून अन्न तयार करे, स्वयंपूर्ण शब्दाचा जणू अर्थ बहुपयोगी, औषधी गुणधर्म त्यात, अगदी पालापाचोळा देखील होई खत, त्याच्या फळांच्या बियांमधून