वनराई
ही वनराई, सदा हरित, सृष्टीचे सौंदर्य अन नियमनचे मुख्य साधन देई प्राणवायू, देई नाना फळे रसाळ गोमटी, अनेकांचे निवासस्थान पाने फुले अन फळे औषधी,
झाडे
ही झाडे, सदा टवटवीत, कुठून येई ऊर्जा यांच्यात? ऊन वारा पाऊस, तरीही न त्रागा कसला, न चिंता देखील वाऱ्या संगे डुलतात, उन्हात अन्न तयार करतात, पावसात जणू जलाअभिषेक
झाडे
झाडे पृथ्वीचे रक्षक, सदा हरित, सदा उत्साही पाहता यांना उत्साह येई, ऊन वारा पावसाचा मारा, न आडोसा सदा सर्वदा बाहेर तरी सदैव आनंदित, वाऱ्या संगे डुले,