काचपट्टी वेळ आजचा नवा दिवस मोजतो, प्रत्येक बोटांत गुंतले प्रकाशाचे जाळे, डोळ्यांत चमकते अनंत जगाचे रूप, पहाटेच जागे होताच हातातील चकाकी,

भ्रमणयोजक हातात धरी, जगाशी नाते क्षणात जुळी, ज्ञानवाणीचा खुलतो दरबार, शब्दांत गुंफले अंतरांचे धागे, चित्रांत उलगडले आठवणी जागे, क्षणोक्षणी वाहते संवादधार,

भ्रमणयोजक जणू एक सहाय्यक, करे सर्व कार्ये, करी काम सुकर क्षणात देई हवे ते, मनोरंजक असो की संपर्क, नकाशा असो की हवामान वा असो कार्यालयीन कार्य,

भ्रमणयोजक एक उत्तम सहाय्यक, पूर्वी धनाढ्य लोकांकडे असे मदतनीस, तसा काहीसा हा भ्रमणयोजक सांगाल ते कार्य करे, कुणास संपर्क, कुणास संदेश एखादी गोष्ट शोधून देई,