उद्योग

उद्योग

उद्योग करे प्रत्येकजण,
ज्यात ज्याला रस,
ज्यात होई उदरभरण ते करे सर्वजण

नोकरी हाही एक प्रकारचा व्यवसाय,
काही ठराविक कामांचा अन काही ठराविक तासांचा व्यवसाय,
याउलट व्यवसाय चोवीस तासांची नोकरीच

जबाबदारी अधिक,
तितका नफा देखील,
पूर्ण स्वातंत्र्य

प्रत्येकाची आवड निवड,
यश अपयश तात्कालिक,
जसे जीवनाचे तसेच उद्योगाचेही

कधी यश कधी अपयश,
अर्थकारणाचे येई ज्ञान,
आर्थिक सज्ञान हा महत्वाचा विषय

पैसे कमावणे ही एक कला,
तिचा नीट वापर ही त्याहून मोठी कला,
अन बचत केलेल्या पैशातून पैसे कमावणे त्याहून अधिक मोठी बाब

जी गोष्ट विकली जाऊ शकते त्या प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय करणे शक्य,
जरी भासे अवघड तरी न इतकेही ते,
थोडस धाडस

अन विक्रीची कला आवश्यक,
नाहीतर केवळ समाजसेवा होऊन जाई,
न त्यापेक्षा अधिक

व्यवसाय एक धाडस,
जसे एखादे स्वराज्य उभे करण्याचा प्रकार,
चिकाटी अत्यंत आवश्यक

No Comments
Post a comment