ग्राहक – उद्योगाचा मूळ
ग्राहक ज्यासाठी उद्योग उभे,
त्याच्या आवडी निवडवर तयार होती उत्पादने,
त्यासाठी चाले अभ्यास
त्यासाठी जाहिरात क्षेत्र उभे,
चौकाचौकात मोठमोठे फलक,
त्यासाठी यत्र तत्र मार्गांनी केली जाई जाहिरात
लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नाना रंगांची उधळण,
तारकांच्या तोंडून घेतेले जाई वदवून,
हसरी पात्रे सांगे त्याचे महत्व
देई समजावून महत्व,
सोडत सवलत मोफत शब्दांची गुंफण,
त्याच्या आवडीचे रंग त्याच्या सोयीची रचना
येता ग्राहक हास्य वदनाने स्वागत होई,
दाखवले जाती नाना पर्याय,
किमतीत देखील होई घासघीस
त्याच्या इच्छेनुसार चाले उद्योग,
सामान्य वाटे परी उद्योगाचा मूळ ग्राहक,
त्याच्याशिवाय न चालू शके कोणताही उद्योग
कारखाने दळणवळण कामगार,
आणि अर्थव्यवस्थेचा पाया ग्राहक,
त्यावर देशोदेशीचे व्यवहार
0 Comments