शिस्त – एक गुण

शिस्त

शिस्त महत्वाची,
श्वसन चाले नियमानुसार,
ठराविक वेळेत आत घेतला जाई श्वास

ठराविक काळाने सोडला जाई श्वास,
त्यामुळे चाले जीवन सहज,
इतके सहज की न कळे श्वसन क्रिया

झोपेत देखील चाले अखंड,
ठरलेल्या वेळी करता गोष्टी,
वस्तूंची निटनेटकी मांडणी

शाळेतील घंटा वाजल्यावर वर्गात,
वाहतुकीचे दिवे पाळणे,
कर भरणे

सगळे काही शिस्तीचा भाग,
शिस्त देई विश्वास,
आखता येई भविष्याचे नियोजन

जणू आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार,
नाहीतर सगळंच अनियंत्रित,
शिस्तीचे त्यासाठी महत्व

जीवनाला येई आकार,
एक उत्तम गुण,
जो देई स्थैर्य

जसे दिवसानंतर येई रात्र,
रात्रीनंतर दिवस,
चाले निरंतर क्रमण

ही शिस्त जीवनाचा एक अलंकार,
काहीसे कठीण,
अंगवळणी पडता एक बळ

1 Comment
Post a comment