सूर्य
नभात येतात सोनेरी किरण,
होई आसमंत सोनेरी,
सरे रात्र येई सूर्य आकाशी
होई सकाळ सुरू होईल जीवनचक्र,
पक्षांचे किलबिलाट,
चराचर सुरू करे आपले कार्य
झाडे करे प्रकाश किरणांपासून अन्न,
सृष्टीला भेटे ऊब,
प्रकाशित होई सर्व वातावरण
लख्ख प्रकाश उल्हसित करे सर्व सृष्टी,
होई आनंदमयी दिवसाची सुरवात,
कारखान्यात सुरू होईल कार्य
रस्त्यांवर वाहनाची वर्दळ,
वस्तु भांडारे उघडे,
सुरू होई अर्थचक्र
सुरू होई धावपळ,
लोकांच्या गाठीभेटी,
कुठे शेतात नांगरणी
कुठे कार्यक्रम,
कुठे सभा,
जीवनाला येई आकार
होता होता मावळे दिवस,
सांजवेळी पुन्हा होई आसमंत सोनेरी,
म्हणता म्हणता जाई तो होऊन गुडुप
सर्व होई शांत,
सर्व कार्ये होई संथ,
पक्षी प्राणी अन चराचर जाई गाढ निद्रेत
इतक्या गोष्टी होई सूर्यामुळे,
सृष्टीचा चालक,
उर्जेचा स्त्रोत
0 Comments