नियोजन
नियोजन एक महत्वाची गोष्ट,
असता नियोजन सर्व काही साध्य,
जणू भविष्याचा घेतलेला वेध
योजलेले कार्य कसे पूर्णत्वास न्यायचे याची आखणी,
कधी कशा रीतीने होईल कार्याची पूर्ती?
याचे अवलोकन
जितके बारकाईने होईल योजना तयार,
तितकी यशाची हमी हमखास,
अंमलबजावणी मग देई यशाचे पान
नियोजन म्हणजे उद्याचा वर्तमान,
अथवा सावळा गोंधळ,
वेळ न राही ताब्यात
काय करतो आहोत याचे न राही भान,
निशाणा न धरता सोडलेला बाण,
हवेत गोळीबार
खरतर अनुभव हाच यात गुरु,
चुका आणि त्यातून सुधारणा यातून भेटे ज्ञान,
परी नियोजन आवश्यक
नाहीतर युद्धभूमी होई सर्व,
यशाला गवसणी घालण्याची मग सर्व शौर्यावर मदार,
नियोजन देई खात्री यशाची,
चाखता येई यशाची चव
0 Comments