समाज माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढतोय आज, प्रत्येक हातात पडद्यामागचा विश्वाचा राज, शब्दांमधून घडतो नवा संवाद, नवे विचार, चित्रांतून झळकते वास्तवाची झलक,

कला सृष्टीच्या श्वासात दडलेले विलक्षण तत्त्व, भावनांच्या लहरींवर तरंगणारे अमर सौंदर्य, मनाच्या गाभाऱ्यातून उमलणारे सृजनाचे पुष्प चित्रकाराच्या तूलिकेत ती वाहते रंगस्वप्नासम, गायकाच्या स्वरात ती उमलते नादब्रह्मरूपे, नर्तकीच्या पावलांत ती थिरकते जीवनाचा ताल धरी अनुभवाचा तेजोमय प्रवाह, ती जिथे थांबते, तिथे निर्माण होते अर्थ, आणि जिथे उमटते, तिथे जन्मते

कला असे प्रत्येकात, एक गुण जो देई जीवनाला अर्थ, कुणाकडे असे गायनाची कुणी उत्तम चित्रकार, कुणी लेखक, कुणी वादक कुणी कवी, कुणी संशोधक, कुणी नृत्य करे सुंदर

कला कल्पक अन सृजनशील प्रांत, जिथे आनंदाचा अन चैतन्याचा वास, सकारात्मक ऊर्जा कल्पनेतून चित्र उतरे, कलेतून नाना शिल्प घडे, कुणी मूर्ती घडवे कुणी नृत्य सादर करे,

उपजीविका प्रत्येकाची, प्रत्येकाची कला, प्रत्येकाची आवड कुणी लोहार कुणी कुंभार, कुणी करे बांधकाम, कुणी विकसक कुणी दुकानदार, कुणी चालक, कुणी चालावे उपहारगृह