उपजीविका प्रत्येकाची,
प्रत्येकाची कला,
प्रत्येकाची आवड

कुणी लोहार कुणी कुंभार,
कुणी करे बांधकाम,
कुणी विकसक

कुणी दुकानदार,
कुणी चालक,
कुणी चालावे उपहारगृह

प्रत्येकाची कला,
त्यातून उभी राही अर्थव्यवस्था,
अर्थचक्राचे प्रत्येकजण भाग

कुणी भुकेसाठी,
कुणी छंद म्हणून करे कार्य,
कुणाला आनंद कुणाला अर्थ मिळे यातून

उपजीविका हे जगण्याचे साधन,
देई अर्थ देई दिशा जीवनास,
त्यासाठी शिक्षण

शिक्षणातून भेटे ज्ञान,
ज्ञानाने जोपासता अन वाढवता येई कला,