तू परीस

आशा

तू परीस,
तुझ्यामुळे या लोहाचे झाले सुवर्ण,
हे सोनेरी क्षण

अनुभवतो क्षणोक्षण,
तू आनंदाची लाट,
सुखावते या किनाऱ्यास

प्रफुल्लित होई मन,
आनंदाचा कल्लोळ,
तू हास्य

देई उत्साह,
अन बळ,
जसे एखादे सुंदर फूल

क्षणात मोहूनी जाई मन,
तू लावण्याचे मूर्तिमंत उदाहरण,
किती पहावे तुज

अधिकच वाढे ओढ,
ती हास्याची खळखळ,
नवजीवनाचा उत्सव

किती ती कोमल काया,
किती आखीव रेखीव तो चेहरा,
स्वर्गाची माया

जणू स्वप्न उभे समोर,
तू सौंदर्याची व्याख्या,
पाहत राहवेसे वाटे आयुष्यभर तुला

माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर,
हवी आहेस तू मला,
हवी आहे तुझी जन्मोजन्मीची सोबत मला

No Comments
Post a comment