ती अनामिक

ती अनामिक,
जणू स्वप्नांची,
कोमल नाजुक
मधाळ डोळ्यांची,
ती हास्याची खळखळ,
ती आनंदाची खणी
तो सौंदर्याचा अवतार,
ती प्रेमाची आकाशगंगा जशी,
आनंदाची खाण
उत्साहाची जणू लाट,
प्रफुल्लित सुगंधित,
जणू गुलाबाची कळी
नुकतीच उमलली जशी,
ती स्वप्नांची पहाट,
लावण्याची व्याख्या जणू काही
किती पहावे तिजला,
स्वप्नच जणू उभे सामोरी,
जीवनाची तृप्ती
चैतन्याची पहाट नवी,
ते येणे ते जाणे,
ती परी जी देई जगण्याला दिशा माझी
ते रूप सोनेरी,
अप्सरा जणू अवतरली भूवरी,
माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर माझी राणी
0 Comments