जाहिरात

जाहिरात

जाहिरात एक उद्योग,
प्रत्येक उद्योगाचा श्वास,
नाना आकार

नाना प्रकार,
रस्त्यावरील फलक असो की भ्रमणयोजकातील जाहिराती,
वा दुसंच मधील जाहिराती

कल्पकतेचा प्रांत,
नाना रंग,
नाना कलाकार आणि नाना शब्दांची गुंफण

उद्योगाचा व्हावा प्रचार,
उत्पादनाकडे आकर्षित व्हावे ग्राहक,
त्यातून वाढवा उद्योग

हा मुख्य हेतु त्यामागील,
त्यातून चाले अर्थचक्र,
जितकी प्रभावी जाहिरात

तितके अधिक ग्राहक,
मग ती जाहिरात तयार करण्यासाठी नाना संस्था,
रचनाकार, प्रसिद्धी आणि माहीतीकार

अभ्यासले जाई ग्राहकांचा आशा अपेक्षा अन आवडीचे विषय,
तोही एक मोठा विषय,
जाहिरातीसाठी चाले निरंतर कार्य

सोडत मोफत अन सवलत शब्दांची गुंफण,
त्यासाठी मोठमोठे तारका जाहिरातीत,
त्यांच्याकडून वदवून घेतले जाई वाक्ये

जेणेकरून वाढावा उद्योग अन विक्री,
संस्थेची हो भरभराट,
असा हा जाहिरात उद्योग

No Comments
Post a comment