तू स्वप्न

प्रेम

तू स्वप्न,
स्वप्नातीत,
तू आनंद

क्षणात मन होई प्रफुल्लित,
तू सौंदर्य,
तू हास्याची खळखळ

तू लावण्याची लतिका,
सुखाची परिमळ,
जगण्याचा मंत्र

तू परीस,
तुझ्यामुळे या जीवनास आकार,
तू अर्थ

तुझ्यामुळे हे जीवन परिपूर्ण,
तुझी अनुभूती देई उत्साह अन बळ,
तू जीवनाचा अर्क

तुझ्यामुळे सुखमय सर्व,
तू प्रेम,
तू अमृत

तुझ्यामुळे या जीवनाला नवसंजीवनी,
तू क्षण,
तुझ्यामुळे हे अमरत्व अनुभवतो क्षणोक्षण

तू वर्षा,
तुझ्यामुळे तृप्त होई तन मन,
तू जगण्याचा मंत्र

तुझ्यामुळे या जीवनाला कलाटणी,
अनुभवतो हे सुख असामान्य,
माझे मनापासून प्रेम आहे तुझ्यावर

No Comments
Post a comment