नियोजनाचे महत्व

नियोजनाचे महत्व

नियोजनाचे महत्व अपार,
जसे चित्रगुप्त रेखाटे जीवनाचे चित्र,
जसे कथाकार कथा लिही

तसे काहीसे हे पुढील काळाचे चित्र,
कसे असावे जीवन?
कसे असावे कार्य?

कशाप्रकारे जावे पुढे?
कसे व्हावे कार्य?
ह्याचे ते चित्र

उद्याचे भविष्य रेखाटणे म्हणजे नियोजन,
मग राही शिल्लक केवळ त्यावर मार्गक्रमण,
नाहीतर सावळा गोंधळ

युद्धभूमीच होई क्रमण,
कुठून कसा होईल हल्ला,
याचे नसे आकलन
 
मग सगळया गोष्टी केवळ चमत्कारावर,
त्यासाठी हवे नियोजन,
झरझर होती कार्ये
न पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज,
न चिंतेची गरज,
अंमलबजावणीवर सारी भिस्त

ठरवल्यानुसार केली कार्ये,
भेटे यश सहज,
पालन केले आखणीचे हमखास

जितक्या कुशलतेने आखणी,
तितके यशाचा मार्ग स्पष्ट,
यशाचे गमक

No Comments
Post a comment